आधार वैद्यकीय व शैक्षणिक संस्था
भुईगाव, वसई

सक्षम समाज बांधणी द्वारे शाश्वत विकास साधणे

मला अधिक सांगा

आमचे कार्यक्रम

◆ Heart attack' and diet

आपल्या भागात बदलत्या जीवनशौली मुळे हृदय रोगाचे प्रमाण वाढत आहे. अनेक जणांना प्राणास मुकावे लागत आहे. याबाबत मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर मार्फत हृदय रोग आजार, लक्षण, उपाय व आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

◆ Cancer checkup Camp

आपल्या वसईत व गावात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सर बाबत जन जागृती सोबत मोफत कॅन्सर तपासणी शिबिर जलपुष्प सिस्टर सोबत आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी इंडियन कॅन्सर सोसायटी यांनी मोलाची भूमिका निभावली . साधारण १०५ जणांनी सदर मोफत शिबिराचा लाभ घेतला.

◆ Mental health and Women Wockeart hospital

महिला आजार, मानसिक आजार, वृध्द काळात घेण्याची काळजी याबाबत वोखार्ट हॉस्पिटल व आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मीरारोड येथे आयोजित कार्यक्रमात आपल्या भुईगावमधील महिला ५० महिलांनी सहभाग घेतला.

◆ Aadhar blood donation camp

जाणीव संघटना मार्फत आयोजित रक्तदान शिबिरात आधार संस्थेने सहभाग दिला.

◆ Session on women

महिला व आजार याबाबत मार्गदर्शन करताना मुंबई येथील प्रसिद्ध डॉक्टर शशांक केतकर

◆ आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

यावर वसईतील प्रसिद्ध पथनाट्यकार जुरान पोलीस सर यांनी हसत खेळत विविध उदाहरण देत मार्गदर्शन केले

◆ Aadhar blood camp and Carona Camp

जाणीव संघटना मार्फत आयोजित रक्तदान शिबिरात आधार संस्थेने सहभाग दिला.

◆ Carona vaccine camp

गावातील विविध संस्थांना सोबत घेत भुईगाव चर्च द्वारे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये आधार संस्था द्वारे भरीव मदत व कार्य करण्यात आले

◆ Carona test

करोना काळात रुग्णाची तपासणी, CT स्कॅन, MRCT आदी बाबत आधार सस्थेंद्वारे गावात भरीव कार्य केले

आमचे ध्येय

◆ वंचित ,गरीब ,दुर्बल घटकाला गंभीर आजाराच्या वेळी आर्थिक व वस्तुरूपाने मदत करणे

◆ निरनिराळ्या आजारांसंदर्भात प्रबोधनात्मक उपक्रम राबवून समाजात जागृती निर्माण करणे

◆ आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आदीचे आयोजन करणे

◆ अवयव दान व देहदानबाबत समाजात जागृती निर्माण करणे

◆ आरोग्यकेंद्र ,उपकेंद्र, दवाखाने आदींच्या संयोगाने आरोग्य बाबत विविध उपक्रम राबविणे

◆ आरोग्याबाबत सरकारी योजनेचा लाभ नागरिकाला मिळवून देण्यासाठी उपक्रम राबविणे

◆ युवा वर्गाला मूल्याधारित शिक्षण व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविणे

◆ वंचित व दुर्बल घटकांसाठी सामाजिक, मानसिक व शैक्षणिक विकास करिता उपक्रम राबविणे

◆ वंचित ,गरीब, दुर्बल घटकांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व प्रशिक्षण केंद्र विकसित करणे

◆ शाळा प्रशिक्षण केंद्र वृद्धाश्रम अनाथ आश्रम आदि प्रकल्पांना विकसित करणे

◆ युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षा , रोजगार भिमुख उपक्रम यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे

कार्यकारी मंडळ

...
मेकेन्झी डाबरे
 

अध्यक्ष

...
मनवेल डायस:
 

उपाध्यक्ष

...
एडवीन डाबरे
 

सचिव

...
रॉयल डिसोजा
 

खजिनदार

...
राॅशल मेन
 

सहसचिव

संपर्क

संस्थेचा पत्ता

आधार ऑफिस ऑरेंज मेडिकल वरती पहिला मजला Velernkarni building भुईगाव नाका वसई, पालघर

मोबाईल नंबर

भो: ९६६५००६४२९